अस्सल चवीचा आणि पंगतीचा आनंद
घरगुती चव, पिढ्यानपिढ्यांचे पदार्थ आणि परंपरा जपणाऱ्या पंगती.
जेवण म्हणजे फक्त भूक भागवणं नाही!
कमलिनी कुटीरमध्ये जेवण हा आमच्या पाहुणचाराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आम्हाला असं वाटतं की एखादी संस्कृती समजून घ्यायची असेल, तर तिथल्या जेवणाची चव आधी चाखली पाहिजे.
आमच्याकडे हॉटेलसारखा ‘कमर्शियल’ मेनू नसतो. त्याऐवजी, आमच्या घरात वर्षानुवर्षे बनत आलेले आणि आजी-पणजींपासून चालत आलेले पारंपरिक पदार्थ आम्ही देतो. हे हॉटेलचं जेवण नसून एखाद्या सणासुदीला घरी बनतं तसं अस्सल जेवण आहे.
बसून जेवणाची ती जुनी मजा...
आम्ही तुम्हाला ‘पंगती’साठी निमंत्रण देतो—जिथे जेवण वाढणं हे प्रेमाचं लक्षण मानलं जातं. इथे आम्ही बुफे ठेवत नाही; प्रत्येक पदार्थ तुमच्या ताटात गरमागरम आणि ताजा वाढला जातो. चवीला पारंपरिक असलं तरी बसण्याची सोय मात्र आजच्या काळानुसार आरामदायी आहे. डावीकडच्या मिठापासून ते शेवटच्या गोड पदार्थापर्यंत, या थाळीतील प्रत्येक घास तुम्हाला मराठी संस्कृतीची आठवण करून देईल.
शाकाहारी थाळी
इथल्या मातीत पिकलेल्या भाज्या आणि कडधान्यांचा वापर. गोडा मसाला आणि ताजं खोबरं घालून बनवलेली ही थाळी एकदम सात्विक आणि मनाला तृप्त करणारी असते.
मांसेहारी मेजवानी
जे खवय्ये आहेत त्यांच्यासाठी इथले मांसाहारी पदार्थ म्हणजे पर्वणीच! मंद आचेवर शिजवलेला रस्सा, मऊ मांस आणि घरगुती मसाल्यांचा योग्य तिखटपणा... याची चव तुम्ही विसरणार नाही.
स्वच्छ आणि मनापासून बनवलेलं जेवण
असं म्हणतात की स्वयंपाकघर हे घराचं काळीज असतं. कमलिनी कुटीरमध्ये तर तो आमच्या पाहुणचाराचा आत्मा आहे. आमचं स्वयंपाकघर आम्ही अतिशय स्वच्छ आणि नेटनेटं ठेवतो, कारण तिथे तुमच्यासाठी अन्नपूर्णा वास करते. आम्ही कशा प्रकारे काम करतो हे लपवून ठेवत नाही. जर तुम्हाला उत्सुकता असेल, तर कामाच्या गडबडीची वेळ सोडून तुम्ही नक्कीच आमचं स्वयंपाकघर पाहायला येऊ शकता.